खरच तुला माझी खूप आठवण येते का?
माझ्याशिवाय मन बैचेन होते का?
किती दिवस असा दूर राहणार माझ्यापासून
करमत नाही मला पण तुझ्यावाचुन...!
आता तुझ्या येण्याची बघते आहे मी वाट
तू आल्यावरच करेन आता सगळा थाट...!
कविता लिहिताना तू मला आठवत असतो
कुपितल्या अत्तरसारखा सुगंध तुझा, ह्रुदयभर पसरत असतो!!!
--भाग्यश्री



